You are currently viewing शिक्षक समिती प्रीमियर लीगमध्ये आंबोली – चौकुळ, शेर्ले – नेतर्डे संयुक्त विजेते

शिक्षक समिती प्रीमियर लीगमध्ये आंबोली – चौकुळ, शेर्ले – नेतर्डे संयुक्त विजेते

शिवाजी भरणकर, रमेश पवार व विश्राम ठाकूर ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू

बांदा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या प्रीमियर लीगचे आंबोली -चौकुळ, शेर्ले -नेतर्डे हे संघ संयुक्तपणे विजेते ठरले.
शिक्षकांनी तणावमुक्त व तंदुरूस्त रहावे यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील २० केंद्रातील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता.
जिमखाना मैदान सावंतवाडी येथे अंत्यत अटीतटीच्या झालेल्या प्रत्येक सामन्यात शिक्षकांनी प्रत्यक्ष आयपीएल सामन्यांचा थरार अनुभवला. यावेळी अंतिम सामन्यात शेर्ले केंद्राच्या गोलंदांजानी टिच्चून गोलंदाजी करत भक्कम फलंदाजी असलेला आंबोलीला रोखून धरले होते पण ४थ्या षटकांनंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने खेळ थांबविण्यात आला व दोन संघाना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून शिवाजी भरणकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून रमेश पवार व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विश्राम ठाकूर यांची निवड झाली.
या स्पर्धेतील विजेत्या, सर्व सहभागी तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या लीगमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.
सावंतवाडी शाखेने शिक्षकांच्या तंदुरुस्तीसाठी व आनंदासाठी आयोजित केलेल्या या प्रीमियर लीगला शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सावंतवाडी शिक्षक समिती नेते नारायण नाईक यांनी सर्वांचे आभार मानले तसेच ही स्पर्धा पार पाडण्यासाठी शिक्षकांनी स्वेच्छेने दिलेल्या निधीतून संविता अनाथाश्रमाला मदत देणार असल्याचे सांगितले. ही प्रीमियर लीग यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक समिती सावंतवाडीचे अध्यक्ष सतिश राऊळ व सचिव अमोल कोळी याचबरोबर समितीच्या सर्व शिलेदारांनी विशेष परिश्रम घेतले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − two =