पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 10 व 11 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी रात्री सोईनुसार पोलीस मुख्यालय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 वा. पोलीस मुख्यालय विश्रामगृह, सिंधुदुर्ग येथे राखीव, सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत कोरोना आजार संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक, सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आयुष अधिकारी, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समवेत आयुष हॉस्पिटल संदर्भात आढावा बैठक, दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी,  जिल्हा नियोजन अधिकारी, प्रादेशिक अधिकारी, पर्यटन, सिंधुदुर्ग व संबंधित अधिकारी यांच्या समवेत कविवर्य मंगेश पाडगांवकर स्मारक संदर्भात बैठक, दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे मुख्याधिकारी, कुडाळ  नगरपंचायत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समवेत मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह संदर्भात बैठक, दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समवेत खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल व इतर विषयांबाबत आढावा बैठक, दुपारी 1.30 ते 2.30 राखीव, दुपारी 2.30 वा. डी.पी.डी.सी. नवीन सभागृह येथे जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या समवेत मागील जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्ताच्या कार्यपूर्तीबाबत आढावा बैठक, दुपारी 4.00 वा. नवीन डी.पी.डी.सी. हॉल येथे पत्रकार परिषद, सायं. 5.00 वा. अभ्यागतांच्या भेटी, सायंकाळी सोईनुसार ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा