माजी नगराध्यक्ष कै. शिवाजी कुबल यांना २८ जुलै रोजी शोकसभेत श्रद्धांजली
वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजन; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
वेंगुर्ले
वेंगुर्ला कुबलवाडा येथील रहिवासी, जेष्ठ नेते व वेंगुर्ला शहराचे माजी नगराध्यक्ष कै. शिवाजी रमाकांत कुबल यांचे गुरुवार, दि. २३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेला शहरातील नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित राहून कै. शिवाजी कुबल यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.
