You are currently viewing पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा “सर्वोकृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर..

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा “सर्वोकृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर..

महाराष्ट्र पोलिस महासंचालक आणि सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक यांच्यावतीने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचा “सर्वोकृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

ओरोस रेल्वेस्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीवर रात्रीचा बलात्कार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा योग्य तपास करुन आरोपी जितेंद्र मांझी रा.झारखंड याच्यावरील गुन्हा कोर्टात सिद्ध करुन दाखवल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक श्री.संजय पांडे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांच्यातर्फे “सर्वोकृष्ट अपराधसिद्धी” या पुरस्काराने तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध गावडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र करंगुटकर, पोलिस नाईक राकेश कडुलकर यांचा प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रु.5000 देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या गुन्ह्याच्या तपास करणाऱ्या डीवायएसपी पद्मजा चव्हाण व कोर्टात सरकार पक्षातर्फे बाजु मांडणाऱ्या तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे. आरोपीवर सिंधुदुर्ग नगरी पोलिस स्टेशन गु.र.नं.33/2015, भा.द.वी. 363, 366, 376(1), 506 व पोस्को 4, 5, 6, 8 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा कोर्टात सिध्द होऊन आरोपीला शिक्षा झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा