You are currently viewing परिचारिका दिवस उत्साहात साजरा

परिचारिका दिवस उत्साहात साजरा

प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीमुळे परिचारिका दिवस दिनांक १५ मे रोजी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि मधुमेह रूग्ण संघ तर्फे परिचारिका दिवस दादा दादी उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. भगवान महाजन, मधुमेह संघाचे डॉ. दिगंबर इंगोले मंचावर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.डी वाय कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉक्टर खुर्शिद जमादार या होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीत सौ.शोभना जोशी यांनी म्हटले.

पाहुण्यांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. परिचय सय्यद मैडम (कार्याध्यक्ष)यांनी करून दिला. अध्यक्षांच्या मनोगता नंतर परिचारिकांचा सत्कार सौ आशा नष्टे यांनी जेष्ठ नागरिक संघास दिलेल्या पंचवीस हजार रुपये देणगीच्या व्याजातून भेट वस्तू देऊन करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. ज्योती इंगोले यांनी केले. आभार श्री सुभाष जोशी (उपाध्यक्ष) यांनी मानले.

यावेळी मा.चंद्रश्खर जोशी, आनंदराव मुळुक यांच्या सह सर्व संघांचे अध्यक्ष, सदस्य व कार्यकारणी सदस्य हजर होते. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

संघाच्या सदस्य असणाऱ्या आशा नष्टे, शोभना जोशी, पुष्पांजली सूर्यवंशी, पुष्पा लंके, विभावरी कोटस्थाने, सविता साठे, वत्सला वाघचौरे, क्षिरसागर, माधुरी डिसोजा या ज्येष्ठ परिचारिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा