लसिकरण केंद्रावर भाजप माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी केले ज्यूस पॅकेटचे वाटप

लसिकरण केंद्रावर भाजप माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी केले ज्यूस पॅकेटचे वाटप

वैभववाडी

भाजपच्या माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी लसीकरण केंद्रावरील नागरिकांना ज्यूस पॅकेटचे (ओआरएस) वाटप केले. येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्राला वैभववाडी पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांनी भेट देत पाहणी केली. नियोजनबद्ध सुरू असलेल्या लसीकरणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी लसीकरणसाठी आलेल्या नागरिकांना 100 ज्यूस पॅकेट (ओआरएस) चे वाटप केले. यावेळी वैभववाडी पं.स.उपसभापती अरविंद रावराणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण, संतोष एकावडे, आरोग्य कर्मचारी स्वप्नील रेवडेकर, आरोग्यसेविका नीलम कदम, आरोग्यसेविका एन.टी. जांभवडेकर, प्रकाश तांबे, आशिष रावराणे, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा