You are currently viewing राज्यसभा खासदार विनोद तावडे यांचे सिंधुदुर्गात स्वागत

राज्यसभा खासदार विनोद तावडे यांचे सिंधुदुर्गात स्वागत

१२ मे रोजी कणकवली येथे भाजपकडून सत्कार सोहळ्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा नवनियुक्त राज्यसभा खासदार विनोद तावडे हे १२ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि सत्कारासाठी भाजप जिल्ह्याच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सत्कार सोहळा दिनांक १२ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता प्रहार भवन, कणकवली येथे आयोजित करण्यात आला असून खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष, जि.प. व पं.स. सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विनोद तावडे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा