You are currently viewing आंगणे कुटुंबीयांचे आंगणेवाडी वार्षिक जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाचे नियम तंतोतंत पाळण्याचे भाविकांना आवाहन..

आंगणे कुटुंबीयांचे आंगणेवाडी वार्षिक जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाचे नियम तंतोतंत पाळण्याचे भाविकांना आवाहन..

मालवण :

 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवात येणाऱ्या भक्तांनी गर्दी न करता कोरोनाविषयी नियमांचे तंतोतंत पालन करीत सहभागी होऊन श्री देवी भराडीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आंगणे कुटुंबीयांनी केले आहे.

यात आंगणे कुटुंबीयांनी आंगणेवाडी वार्षिकजत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाचे नियम तंतोतंत पाळण्याचे भाविकांना आवाहन केले आहे.

तसेच करोनाची तिसरी लाट जरी ओसरत असली तरी आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करोना प्रतिबंधक नियमांचे पालन अनिवार्य आहे. मास्क व सॅनिटरायझर बरोबर लसीकरणाचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त नागरिकांनी उत्सवात सहभागी होणे टाळल्यास ते उचित ठरेल. वार्षिक उत्सवात सहभागी होणारे छोटे मोठे व्यापारी बंधूनी देखील त्याच्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आंगणे कुटुंबियांना सहकार्य करावे आणि हा वार्षिकोत्सव दरवर्षीप्रमाणे कुठलेही गालबोट न लागता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत पार पडेल याची दक्षता घ्यावी, असे आंगणे कुटूंबियांनी सर्व भाविक तसेच व्यापारी वर्गाला आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − twelve =