You are currently viewing “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तारतम्य पाळले पाहिजे ” योगिता साळवी

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तारतम्य पाळले पाहिजे ” योगिता साळवी

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तारतम्य पाळले पाहिजे ” योगिता साळवी

‘लव जिहाद: एक ज्वलंत वास्तव’ व्याख्यानात

प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

दिनांक १३ एप्रिल २०२४, शनिवार, या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, महिला विभागातर्फे “लव जिहाद: एक ज्वलंत वास्तव” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती योगिताताई साळवी होत्या. योगिताताईनी समाजातील” लव जिहाद” या विषयावर परखडपणे प्रकाश टाकला. त्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच मुंबई तरुण भारत उपसंपादिका म्हणून कार्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.हिंदू समाजाची मुल्य जोपासली जावीत असा त्यांचा मानस आहे.
लव :जिहाद म्हणजे काय? हे त्यांनी अनेक सत्य घटनांवर आधारित स्पष्ट केले. मुस्लिमेतर धर्मांच्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना सर्रास फसवले जाते. धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. गावागावात, शहरात अशा घटना वारंवार घडत आहेत.
रूपाली चंदनशिवे, श्रद्धा वाडकर, दिल्लीची साक्षी यांसारख्या अनेक मुली लव जिहाद मध्ये अडकून शेवटी मृत्यूच्या सापळ्यात अडकल्या गेल्या.
बऱ्याच वेळा लव जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींचा उपभोग घेतल्यानंतर त्यांची देह विक्री केली जाते किंवा त्यांचे अवयव काढून घेतले जातात असे अनेक क्रूर प्रकार केले जातात. बराच वेळा ड्रग्ज मार्फत जाळ्यात अडकवले जाते. लव जिहादला आळा घालण्यासाठी भावनिक व बौद्धिक दृष्टीने सारासार विचार मुला- मुलींनी केला पाहिजे.
आपल्या हिंदू धर्माचे, संस्कृतीचे महत्त्व आपल्या पाल्यांना सांगून तसे संस्कार पालकांनी केले पाहिजे. योगिताताईनी ‘ भ’ या अक्षरावरून हिंदू धर्माचा जीवनसार सांगितला.भोजन, भजन, भाषा,भूषा, भवन,भ्रमंती. याचे महत्व जाणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे तारतम्य पाळले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. धर्म , कर्म , कुटुंब, समाजहिताचा विचार करत जगावे. सोशल मिडियावर वावरताना सतर्क राहीले पाहिजे. अशा परखड शब्दांत त्यांनी “लव जिहाद” या ज्वलंत वास्तवावर प्रकाश टाकून जळजळत अंजन त्यांनी घातले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन श्रीमती योगिता साळवी, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेशजी बनगोंडे व सहसचिव राजेंद्र जी देशपांडे,महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. शितल गोखले व सहकार्याध्यक्षा सौ. वैदेही पटवर्धन यांनी केले.
प्रास्ताविक सौ. शिल्पा जोशी यांनी सांगितले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. उन्नती वैद्य यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ. शितल गोखले व सौ. वैदेही पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. समृद्धी पैठणकर यांनी केले.
आभारप्रदर्शन सौ. रश्मी दाते यांनी केले.
पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*संवाद मीडिया*

🏠🏠🏬🏬🏠🏠🏬🏬

*मालवणमध्ये 120 हून अधिक घरे विकसित केलेले….*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत तीन यशस्वी प्रोजेक्ट नंतर ‌‌चौथा प्रोजेक्ट…*

*⚜️ समर्थ ऐश्वर्य ⚜️*

*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*
*‌मालवण*

*मालवणमधील सर्वात मध्यवर्ती ठिकाणी…*

*▪️🏖️बीच, 🏤रेस्टॉरंट्स,💹 सुपरमार्केट, , 🛕 मंदीर, 🏦शाळा सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच बरेच काही…..

*▪️मुंबई-गोवा महामार्ग फक्त २९ किमी. चिपी विमानतळ 11 किमी, मोपां विमानतळ 90कि मी वर बस स्टँड 1 किमीच्या आत जिथून बसेस सर्व स्थानिक आसपासच्या भागात जातात.*

*👉आमच्या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य*

*▪️संकुलात स्वामी मंदिर
*▪️आम्पि थिएटर*
*▪️स्मॉल गार्डन
*▪️जिम,, कार वॉशिंग, लॉंड्री
*▪️पार्किंग साठी मुबलक जागा
*▪️अतुलनीय दृश्यांसह सूर्य, समुद्र आणि पर्वत कुठेही न जुळणारा. दोघांसाठी विश्रांती, मन आणि शरीर, एक अतुलनीय विलक्षण घर…घेऊन आले आहेत*

*⚜️. समर्थ ऐश्वर्य ⚜️*
*समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स*

*🔹बुकिंग संपर्क 🔹*

*👉‌‌रजिस्टर ऑफिस*
*C- 201-A, गुरुकृपा CHS, NC केळकर रोड, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प), मुंबई – 400 028.*

*👉साइट पत्ता:*
*मोरे कंपाउंड, बांगीवाडा, कॉलेज रोड, मालवण, सिंधुदुर्ग – ४१६ ६०६, महाराष्ट्र.*

*संपर्क* 👇
*📲+91 90110 84521*
*📲+91 9405913310*
*📲+91 9892213270*
*📲+91 9167723652*

*वेबसाइट:* *www.samarthdevelopers.com*

*महारेरा क्र. P52900053368.PNG C-201A*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा