You are currently viewing शिवसेना युवा नेते  संदेश पारकर यांनी घेतली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची भेट

शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी घेतली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची भेट

शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज कणकवलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची भेट घेतली. गेले काही महिने शिवसेनेत संदेश पारकर यांची घुसमट होत असल्याची चर्चा होती. ते राष्ट्रवादीत परत जातील अशी चर्चा होत असताना, शुक्रवारी संदेश पारकर यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित प्रभारी विनायकराव देशमुख यांची भेट घेतल्याने संदेश पारकर राष्ट्रवादी की काँग्रेस याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा