You are currently viewing आंगणेवाडीत आ. नितेश राणेंच्या हस्ते होणार बचत गटांच्या मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे उद्घाटन

आंगणेवाडीत आ. नितेश राणेंच्या हस्ते होणार बचत गटांच्या मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे उद्घाटन

मालवण

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार दि.०३फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे.

या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे,जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे,आंगणेवाडी विकास समिती अध्यश भास्कर आंगणे,मसुरे सरपंच संदिप हडकर, देउळवाडा सरपंच नरेंद्र सावंत, उमेदचे वैभव पवार,महिला विकास आर्थिक महामंडळ समन्वय अधिकारी नितीन काळे, श्रीम. मानसी पालव सरपंच ग्रामपंचायत बिळवस आंगणेवाडी, बँक संचालक संदिप परब,व्हीक्टर डान्टस,मेघनाथ धुरी जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =