You are currently viewing मोती तलावातील गाळ काढताना दुर्लक्ष

मोती तलावातील गाळ काढताना दुर्लक्ष

शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांचा आरोप

सावंतवाडी

मोती तलाव येथील कोसळलेला कठड्याला सावंतवाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर हेच जबाबदार असल्याचा आरोप शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांनी केला आहे.

ज्यावेळी गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नसून त्या चुकीच्या पद्धतीने काढण्यात आल्याने तो कठडा कोसळला असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

श्री. राणे पुढे म्हणाले, चुकीच्या पद्धतीने गाळ उपसा झाल्यामुळे “तो” कठडा कोसळला आहे. संबंधित गाळ उपसा मोहिमेदरम्यान यंत्रणेला योग्य त्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी देणे आवश्यक होते. ती त्यांची जबाबदारी होती. मात्र तसे झाले नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे यंत्रणेने चुकीच्या पद्धतीने गाळ काढला. हा गाळ काढत असताना कठड्यावर मोठमोठे आघात झाल्यामुळे त्याचवेळी तो खचला होता. तर पावसाळ्यात तो पूर्णतः कोसळला. या प्रकाराला सर्वस्वी मुख्याधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती.

जरी आमदार केसरकर यांच्या माध्यमातून कठडा दुरुस्तीसाठी एक कोटी प्राप्त झाले असले तरी तो निधी शासनाने मुख्याधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करून घ्यावा, अशी मागणी आपण करणार आहे. त्यासाठी आपण जनहित याचिका देखील दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + nine =