You are currently viewing विनायक राऊत यांची अपयशी खासदार अशी समाजात नोंद – नासीर काझी

विनायक राऊत यांची अपयशी खासदार अशी समाजात नोंद – नासीर काझी

विनायक राऊत यांची अपयशी खासदार अशी समाजात नोंद – नासीर काझी

गतिमान विकासासाठी महायुती सोबत रहा

भाजपा भटके विमुक्त आघाडीची वैभववाडी येथे बैठक

वैभववाडी
धनगर समाज बांधवांसाठी खासदार विनायक राऊत यांचे योगदान काय ? समाजाला गृहीत धरून मताचा जोगवा मागणाऱ्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे. विनायक राऊत यांची अपयशी खासदार अशी समाजात नोंद झाली आहे. गतिमान विकासासाठी महायुती सोबतच सर्वांनी राहिले पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी केले.
वैभववाडी येथे भाजपा भटके
विमुक्त आघाडीची बैठक पार पडली. आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या कामाचे काझी यांनी कौतुक केले. समाजासाठी प्रामाणिकपणे काळे काम करत आहेत. जनतेच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी त्यांची धडपड नेहमीच राहिली आहे.
आमदार नितेश राणे यांनी धनगर बांधवांना विकास प्रक्रियेत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. समस्या, अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच उभे राहिले आहेत. तांडा वस्ती, जिल्हा वार्षिक, जनसुविधा, डोंगरी विकास अशा विविध योजनातून अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. जनतेने प्रवाहासोबत राहून विकास साध्य करून घेतला पाहिजे असे आवाहन काझी यांनी केले. समाजातील प्रलंबित प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावले जातील. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला शंभर टक्के मतदान करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत असे सांगितले. यावेळी विविध कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन काझी यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा उपाध्यक्ष मारुती मोहिते, तालुकाध्यक्ष गंगाराम अडुळकर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =