You are currently viewing 16 फेब्रुवारी रोजी  ऐतिहासिक यशवंत गड किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

16 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक यशवंत गड किल्ला व समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि आयकॉनिक सप्ताहानिमित्त दुर्ग संवर्धन मोहिमेंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडकिल्ल्यावर बुधवारी 16 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, वेंगुर्ले पंचायत समिती आणि रेडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. यात ऐतिहासिक यशवंतगड किल्ला व समुद्र किनारा स्वच्छतेचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी नऊ वाजता या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. तरी सर्व नागरिक दुर्गप्रेमी यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विद्यमान सदस्य प्रितेश राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा