You are currently viewing मुंबई युनिव्हर्सिटी च्या भोंगळ कारभारामुळे विधी विभागाच्या अंतिम परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा 15 मार्कंचा पेपर राहिला

मुंबई युनिव्हर्सिटी च्या भोंगळ कारभारामुळे विधी विभागाच्या अंतिम परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा 15 मार्कंचा पेपर राहिला

मुंबई

परीक्षा एका दिवसावर आली असतानाही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट, सेंटर ची माहिती न कळवून मुंबई विद्यापीठाने त्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगून ठेवल्याचा आरोप ॲड. धनंजय जुन्नरकर , प्रवक्ता महाराष्ट्र काँग्रेस ह्यांनी केली आहे.

1 .विद्यार्थ्यांना काल रात्री 10 ते 11 30 च्या दरम्यान हॉल तिकीट जनरेट होऊन मिळाले

2. प्रत्येकाकडे प्रिंटर नसल्याने सकाळी प्रिंट कुठून काढावी म्हणून तणाव

3. हॉल तिकीट वर प्रिन्सिपल ची सही व कॉलेज चा शिक्का घ्यायला सकाळी कॉलेज मध्ये जावे लागले.

4. 10.30 चा पेपर असल्याने काय करावे हे सुचेनासे झाले

5. -कॉलेज एकीकडे सेंटर दुसरीकडे असल्याने विद्यार्थ्यांना मोठा प्रवास करावा लागला

6 . सेंटर वर पोहचल्यावर बैठक व्यवस्थेच्या लिस्ट मध्ये नावे नव्हती कारण हॉल तिकीट रात्री जनरेट झाले

7. त्यामुळे आपला वर्ग कुठे हे विचारणे व नंतर ह्यांची व्यवस्था होणे ह्यात 20 ते 25 मिनिटे वाया गेलेली आहेत.

8. त्यामुळे 12 ते 15 मार्कंचा पेपर विद्यार्थ्यांना लिहिता आलेला नाही,

9 . ह्याला जवाबदार कोण ?? असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत.

10 . दोषींवर आदरणीय चंद्रकांत पाटील ह्यांनी कठोर कारवाई करावी तसेच प्रश्नपत्रिका तपासताना अशा विद्यार्थ्यांना काही गुण वाढवून द्यावे अशी मागणी ॲड. धनंजय जुन्नरकर , प्रवक्ता महाराष्ट्र काँग्रेस ह्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा