You are currently viewing वैभव मराठीचे

वैभव मराठीचे

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वैभव मराठीचे*

 

महाराष्ट्री माझी माय मराठी

मराठी व्हावी अभिजात भाषा

सर्व मराठी जनांची मनिषा

इतिहास आहे प्राकृत भाषा

-१-

प्राचीन प्राकृत भाषा मराठी

संस्कृत कुळीची राजस भाषा

देवनागरी लिपीचा वारसा

चौदा कोटी जनांची असे भाषा

-२-

बावन्न लोकभाषांची मराठी

कोळी नि अहिराणी, मालवणी

बोली वऱ्हाडी आगरी, कोकणी

कुणबी,माणदेशी, खानदेशी

-३-

महानुभावी प्रथम मराठी

लीळाचरित्र म्हाइमभटांचे

विवेकसिंधु मुकुंदराजांचे

अक्षीच्या प्राचीन शिलालेखाचे

-४-

तिसरी ही मोठी भाषा मराठी

देशात मराठी भाषेची शान

हिंदवी स्वराज्याचे गुणगान

छत्रपती शिवाजींनी सन्मान

-५-

गाथा सप्तशती ग्रंथ मराठी

ओवी, अभंग,लावणी, पोवाडा

आर्या,फटका,भारूडा गराडा

रांगडी, राकट, परि गोडवा

-६-

शोभे शारदेचे लेणे मराठी

कथा, काव्य,कादंबरी, नाटक

साहित्याचे मराठी उपासक

पुल, अत्रे, साने , कुसुमाग्रज

-७-

संत वचने समृद्ध मराठी

ज्ञानेश्वर, तुकाराम संपदा

एकनाथ, रामदास,ते वंदा

इथे वैभवशाली परंपरा

-८-

उपदेशास्तव माय मराठी

स्वामी समर्थ, गजानन राणा

साईबाबा, तयांचा अलग बाणा

प्रत्येकाचा स्वाभिमान मराठी

-९-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर२१ स्कीम१०

यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

मो 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + ten =