You are currently viewing तुझ्यासवे

तुझ्यासवे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी पंकजकुमार ठोंबरे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तुझ्यासवे*

अनाथ आसवांस तूच ओंजळीत घेतले
तुला क्षणात मानले सखी जगात आपले

कुठून सौख्य आणलेस झोपडीत एवढे
सुहास्य चंद्र पाहताच लाजलेत बंगले

जिथे तिथे कणाकणात अन क्षणाक्षणात तू
मनात काळजात मी तुझेच नाव गोंदले

उन्हात जीव पेटला किती सखी तुझ्याविना
विजांत पावसात मन तुझ्याकडेच धावले

तुझ्यासवे तुफान वादळात छान वाटले
हळूच ओठ चुंबताच रान रान पेटले

नको मला जगातली क्षणीक पोरकी सुखे
समृद्ध स्वर्ग सातही तुझ्या मिठीत लाभले

*पंकजकुमार उत्तम ठोंबरे*
कोन्डोली वाशीम ९५०३७१७२५५

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + nineteen =