*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रेमभावना…*
प्रेमाची हो भाषा निराळी नयन बोलती तिथे
खाणाखुणा नि झुकती नयने आणि शिरशिरी उठे..
रोमांचांनी तनू बहरते स्वप्ने रंगती मनी
धकधक धकधक हृदयी होते तनू पेटते धुनी..
वाट पाहती प्रेमवीर हो काळ तो कठोर होतो
क्षण क्षण तो एक एक हो परीक्षाच मग घेतो..
नयन वाहती नदी बनूनी लागत नाही मन
प्रियासाठी मग तगमग तगमग तरसतो कणकण..
प्रियकर येता खुले चेहरा पाहूनच खुश होती
जणू गवसला हातामध्ये अनमोल जणू तो मोती..
जीव टाकती किती पहा ना विसरून जाती भान
जीवपडोनी भांड्यामध्ये होते मोकळे रान..
खुदूखुदू हसती पाहूनच हो भरून जाते पोट
बोलायाचे असते खूप पण अस्फूट होती ओठ..
रात्रीचे मग अलगद येती गुलूगुलू दोन्ही पक्षी
मन:पटलावर उलगडते मग एक अनोखी नक्षी..
व्यक्त कराया प्रीति मनातील कशास हवे हो शब्द
हळूवार स्पर्शातून कळते प्रेमीयुगुल नि:शब्द..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
