You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’चे आयोजन

२८ व २९ नोव्हेंबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर U-17 मुलींची फुटबॉल स्पर्धा; राज्यस्तरीय खेळाडूंचा सहभाग

सावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलींना फुटबॉल खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात प्रथमच ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग’चे आयोजन करण्यात आले आहे. ही U-17 वयोगटातील मुलींची फुटबॉल स्पर्धा २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पार पडणार आहे.

या स्पर्धेत खेमराज बांदा, नाबर बांदा, एस.व्ही.एस.व्ही. माणगाव, फुटबॉल क्लब सिंधुदुर्ग, मिलाग्रीस सावंतवाडी, स्टेपिंग स्टोन स्कूल कोलगाव, सिंधुदुर्ग जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि संजीवनी क्लब हे संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिक, चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी संघांनाही चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रवी कोकाटे आणि व्यवस्थापक श्री. वसंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलींच्या या क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक पाटणकर एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा