You are currently viewing विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

 

आपण मंदिरात दर्शन घेतो ते देवाचं प्रतीक असतं. *प्रत्यक्ष देव पाहता येत नाही पण देव होता येत. त्यासाठी माणसाने आपलं कर्म आणि वर्तन चांगले ठेवणे आवश्यक आहे.* जीवनविद्या सांगते कि *सत्ता, संपत्ती यामध्ये सुख नसून खरे सुख दुसऱ्यांना आनंद देण्यातच असून सकारात्मक मानसिकताच खऱ्या सुखाचे स्रोत आहेत.* मानवी जीवनात अध्यात्मिक गोष्टीला फार महत्वाचे स्थान असून अध्यात्मिकतेमुळे जीवनाला नवीन दिशा मिळते. आणि शिक्षणामुळे हुशारी मिळते. परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी हुशारी लागते तर *जीवनाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळण्यासाठी हुशारी नव्हे तर ‘शहाणपण’ खूप आवश्यक आहे.* अभ्यास, खेळ आणि विश्रांती या तीन गोष्टी विद्यार्थ्यांच्या जीवनात खूप महत्वाच्या आहेत ह्याची जाणीव करून देण्यासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची आहे.

*विचार बदला’ नशीब बदलेल* विचारांची संगत सोडता येत नाही म्हणून जीवनात सतत चांगलेच विचार करणे गरजेचं आहे. आणि म्हणून *विचार पहा’ विचार ओळखा’ आणि विचारांना योग्य दिशा द्या.म्हणून ज्ञान हाच देव तर अज्ञान हा सैतान होय. असं जीवनविद्या सांगते.*

 

*– सद्गुरु श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =