You are currently viewing सेट परीक्षेत प्रा.आशा कानकेकर-रावराणे यांचे सुयश

सेट परीक्षेत प्रा.आशा कानकेकर-रावराणे यांचे सुयश

तळेरे ज्युनिअर काॕलेज प्राध्यापिका आशा कानकेकर यांचे सेट परीक्षेत यश

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, तळेरेच्या ज्युनिअर विभागाच्या प्राध्यापिका आशा बाळकृष्ण कानकेकर-रावराणे यांनी नुकत्याच झालेल्या राज्य प्राध्यापक पात्रता , सेट परीक्षेत उज्वल यश संपादन केले. प्रा. आशा कानकेकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्था , शाळा समिती व विद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर, शरद वायंगणकर, निलेश सोरप, संतोष जठार , संतोष तळेकर, तळेरे गावचे उपसरपंच दिनेश मुद्रस प्राचार्य एस.जी.नलगे , ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल वनकर , तळेरे ग्रामस्थ शैलेश सूर्वे, जठार , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रा आशा कानकेकर यांनी हिंदी, मराठी व समाजशास्त्र या तीन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असून त्या हिंदी या विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , कार्यकारी मंडळ , प्राचार्य आणि सर्व सहका-यानी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 5 =