You are currently viewing 29 जुनला भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमाचे आयोजन

29 जुनला भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील चराठा येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये बुधवार २९ जूनला सकाळी १० वाजता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘वेध भविष्याचा, तंत्रशिक्षण निवडण्याचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरीच्या संधी,अभ्यासक्रमाचे स्वरूप तसेच प्रवेश प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मागील शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. सध्या औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरुप बदललेले असून त्यादृष्टीने आवश्यक ते बदल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने पॉलीटेक्निक अभ्यासक्रमामध्ये केले आहे. यामध्ये प्रात्यक्षिक ज्ञानावर जास्त भर दिला असून विविध मायक्रो प्रोजेक्टस्च्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला जातो. यासंबंधीची सखोल माहिती यावेळी दिली जाणार आहे. कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. सावंतवाडी बसस्थानक ते कॉलेजपर्यंत ये-जा करण्यासाठी स्कूल बस सुविधा यावेळी उपलब्ध असणार आहे. नाव नोंदणीसाठी ०२३६३-२७३५३५/२७३४५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =