You are currently viewing कलमठ,तरंदळे,भरणी मुख्य रस्त्याचे काम ४ दिवसांत सुरू न न झाल्यास आंदोलन छेडणार

कलमठ,तरंदळे,भरणी मुख्य रस्त्याचे काम ४ दिवसांत सुरू न न झाल्यास आंदोलन छेडणार

भाजपचे ‘सा.बां.वि.’ कडे निवेदन सादर ….!

कणकवली

कलमठ,तरंदळे,भरणी मुख्य रस्त्याचे काम येत्या ४ दिवसांत सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भाजपतर्फे सार्वजिनक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कलमठ तरंदळे भरणी मुख्य रस्त्या हा वाहतूकीस धोकादायक तसेच खड्डेमय बनला आहे . रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आम्ही वेळावेळी आपल्याकडे पाठपुरावा केलेला आहे . परंतु कोणतीही कार्यवाही अदयाप झालेली नाही . रस्त्याच्या कामाची निवीदा गेले दोन वर्षापूर्वी झालेली असून सदर कामाचे आदेश देवून गेली ६ महीने झालेले असल्याचे समजते . परंतू संबंधित ठेकेदाराने सदरचे काम अदयाप सुरु केलेले नाही हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनलेला असून रस्त्यावरून सततची वाहतूक होत असते परंतू याबाबत दखलही आपले यंत्रणेने घेतलेली नाही त्यामुळे येत्या ४ दिवसांत सदरचे काम सुरू न केल्यास याठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल,असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे . निवेदन देते वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री, कमलेश नरे, रोहित राजीवडेकर , तरंदेळचे माजी सरपंच सुधीर सावंत,मितेश नाटेकर,साधन दिवडेकर,युवा मोर्चा अध्यक्ष सुभाष मालंडकर उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nineteen =