You are currently viewing जिवन प्राधिकरण पाईपलाईन मुळे शेतकऱ्यांचे नुकसान..

जिवन प्राधिकरण पाईपलाईन मुळे शेतकऱ्यांचे नुकसान..

मनसे कडुन शेतकरी अधिकारी एकत्र पहाणी आणि यशस्वी तोडगा…

दोडामार्ग सासोली येथील शेतकरी श्री बाबाजी गजानन देसाई व अन्य शेतकऱ्याच्या भातशेतीचे जीवन प्राधिकरण ने खुदाई केलेल्या पाईप लाईन मुळे होत होते. नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी सदर काम रोखले होते. अधिकारी दमदाटीने काम सुरु करु पहात होते. संपूर्ण रस्त्यावरचे पाणी शेतीमध्ये घुसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागल होते. संबंधित शेतकरी श्री देसाई यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष श्री सूनील गवस व जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. यावेळी प्रत्यक्ष पहाणी करुन तोडगा काढु असे ठरवण्यात आले. संबंधित अधिकारी जोपर्यंत माझे म्हणणे ऐकत नाही तोपर्यंत जीवन प्राधिकरण ने पुढे काम करू नये असा ठाम निर्णय संबंधित शेतकरी श्री देसाई यांनी घेतला होता. तालुका अध्यक्ष सुनील गवस व जिल्हाध्यक्ष श्री धीरज परब , सबंधीत शेतकरी, अधिकारी यांना एकत्रीत सर्व पाहणी केली . व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन पत्रव्यवहार केला जातो परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही अशी तक्रार शेतकर्यानी केली. लगेच जिल्हाध्यक्ष श्री धीरज परब यांनी सर्व कागदपत्राची व दिलेल्या निवेदनाची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित शेतकऱ्यांची मागणी आहे की रस्त्यावरच जे पाणी आहे शेतामध्ये येत असून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे त्या ठिकाणी तीन फूट उंचीचे दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंत घालून द्यावी . कार्यकारी अभियंत्यानी संरक्षक भिंत घालण्यासाठी निविदा करुन काम करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. तसे पत्र सुद्धा सबंधीत शेतकर्याला सां.बा. कडुन देण्यात आले. व अडविलेले काम सुरू करण्यात आले. सदर काम गेली दोन वर्षापासून बंद होते.

यावेळी मनसेचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, कुडाळ उपतालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे, शेतकरी बाबाजी गजानन देसाई व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा