You are currently viewing १४ मे रोजी कुडाळ येथे  शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

१४ मे रोजी कुडाळ येथे शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

कुडाळ :

 

कुडाळात शुक्रवार १४ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजता शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. रमाकांत नाईक म्हणाले की, लस घेवुन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे, पण रक्तदान करून दुसऱ्याला सुरक्षित करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

सध्या १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण सुरु झालेले आहे. लस घेतलेल्या युवकांना दुसरी लस घेतल्यानंतर १४ दिवस म्हणजेच एकूण ४२ ते ५० दिवस रक्तदान करता येणार नाही.

रक्तदाते हे १८ ते ४५ वयोगटातील जास्त असल्याने पुढील काही महिने रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने लस घ्यायच्या अगोदर रक्तदान करावे, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 4 =