You are currently viewing सावंतवाडी २६ पासून रंगणार महिला – पुरुष खुल्या रस्सीखेच स्पर्धा 

सावंतवाडी २६ पासून रंगणार महिला – पुरुष खुल्या रस्सीखेच स्पर्धा 

वाळके मास्तर व्यायाम शाळा, आजी-माजी मित्र मंडळ, स्वराज्य संघटना यांचे संयुक्त आयोजन.

सावंतवाडी :

वाळके मास्तर व्यायाम शाळा, आजी-माजी मित्र मंडळ आणि स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २६ व रविवार २७ ऑगस्ट रोजी महिला आणि पुरुष यांच्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्याला 25 हजार रुपये रोख आणि चषक तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख 15 हजार आणि चषक तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी पाच हजार रुपये आणि बेस्ट फर्स्ट मॅन, बेस्ट लास्ट मॅन आणि उत्कृष्ट खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. या स्पर्धा सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा येथे होणार असून महिला विजेत्यांसाठी अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक विजेता पाच हजार रुपये रोख पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धा वाळके मास्तर जयंतीनिमित्त घेण्यात येणार असून या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मल्लखांबपटू हिमानी परब यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके, पुरुष व महिलांच्या मर्दानी खेळाचे ही प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे. यावेळी पाच नॅशनल बॉडी बिल्डर उपस्थित राहणार असून त्यांच्यामार्फत व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. तसेच रक्त गट तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर झालेल्या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्टेशनला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे ढोल पथक आणि त्यांची फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहेत . तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अॅड बापू गव्हाणकर हे करणार आहेत. कार्यक्रमास राज्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते पप्पू सावंत हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल साटेलकर यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा