You are currently viewing लव्ह मॅरेज vs अरेंज मॅरेज

लव्ह मॅरेज vs अरेंज मॅरेज

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना

लव्ह आणि अरेंज मॅरेज
दोन्ही मॅरेजचे प्रकार
लव्ह मॅरेज तसे सोप्पे
तर अरेंज अवघड फार..

कुंडलीत गुण नाही जुळले
तरीही लव्ह मॅरेज होते
आणि अरेंज मॅरेज हे
गुणमिलनामुळे तुटते..

लव्ह मॅरेजमध्ये नसते
स्थळ बघण्याचे टेन्शन
फक्त प्रपोज करायचा
नि झटक्यात सिलेक्शन..

लव्हने अरेंज मॅरेजचे
केलेय आता प्रमाण कमी
साखरपुडा झाल्यावरही
मॅरेजची मिळत नाही हमी..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 20 =