You are currently viewing श्री देव अनघा दत्त लक्ष्मी स्थिर प्रतिष्ठा मंदिर स्थापना सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

श्री देव अनघा दत्त लक्ष्मी स्थिर प्रतिष्ठा मंदिर स्थापना सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

नेमळे (गांवकर कुंभारवाडी) येथे ॐ श्री योगेन्द्रनाथ श्री देव अनघा दत्त लक्ष्मी स्थिर प्रतिष्ठा सोहळा श्री योगेन्द्रनाथ महाराजांच्या व श्री मनोहर (बाबा)पेडणेकर यांच्या कृपाशीर्वादाने श्री देव दत्त लक्ष्मी स्थिर प्रतिष्ठा मंदिर स्थापना सोहळा बुधवार दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.

मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी बुधवार दिनांक २९ रोजी सकाळी या कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यात सकाळी आठ वाजता प्रायश्चित्त विधि, रामरक्षा पठण व देवतांना नारळ ठेवून प्रार्थना तसेच सकाळी ९ ते १० यावेळेस गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण , मंडप पूजा, मंडप प्रवेश, ध्वजारोहण, व प्रकारशुद्धी हे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर १०:३० ते १:३० या वेळी जत्राधिवास, पीठदेवता, आवाहन, पूजन व रात्री ८ नंतर भजन हरिपाठ व हरिकीर्तन असे कार्यक्रम झाले.

कार्यक्रमच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक ३० रोजी सकाळी आठ ते दहा यावेळी आवाहीत देवतापूजन, शैय्यानिवास, अग्नीस्थापना व सकाळी ९ ते १० वास्तुयाग, ग्रहयाग, प्रधान देवतांचे पर्यायी वहन, तत्वादी हवन, आदी कार्यक्रम झाले, त्यानंतर शेवटच्या म्हणजे ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत आवाहित देवतापूजन उर्वरित हवन स्थापना मुहूर्त, तदनंतर सकाळी ९ ते १० बलिदान, पूर्ण हूत स्थापीत देवतांची पूजा , सकाळी ११ ते १ महापूजा ,महानैवेद्य, उत्तरांग आरती तीर्थप्रसाद व दुपारी १:३० वाजता महाप्रसाद झाला, त्यानंतर रात्री ८ वाजता भजनाचे कार्यक्रम झालेे. या सर्व कार्यक्रमांचे व्यवस्थापक सत्यवान सोंसुरकर, सौ. सावित्री सोंसुरकर (योगेंद्रनाथ भक्त सेवा मंडळ श्री अनघा दत्त लक्ष्मी मंदिर) , गावकर कुंभारवाडी मित्र मंडळ आदी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + three =