You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य उदय भोसले वाढदिवस अभिष्टचिंतन..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य उदय भोसले वाढदिवस अभिष्टचिंतन..

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातून अनेक लोकप्रतिनिधी नावारूपास आले, अनेकांनी लोक कल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. काहीना प्रसिद्धी मिळाली तर काही प्रसिद्धीपेक्षा आपल्या कामावरच समाधानी राहिले, त्यातीलच एक लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य उदय भोसले. राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रांतिक सदस्य हा त्यांचा प्रवास नक्कीच वाखाणण्याजोगी. पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मा. शरद पवारांवर निष्ठा ठेवत पक्षासाठी कट्टर कार्यकर्ता म्हणून केलेलं काम आजच्या राजकारणातील तरुण पिढीला आदर्श घेण्यासारखे आहे.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना प्रकाशात आणण्यासाठी व राष्ट्रवादी पक्ष ग्रामीण भागात पोचविण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम ग्रामीण भागात घेतले आहेत व पक्षाची ध्येय्य धोरणे जनसामान्यांपर्यंत पोचवली आहेत. नेतृत्व व कर्तृत्व असतानाही बऱ्याचवेळा त्यांना डावलण्यात आले, परंतु त्यामुळे नाउमेद न होता त्यांनी पक्षासाठी जोमाने काम करत राहिले. कोरोनाच्या महामारीत आपला व्यवसाय सांभाळत त्यांनी मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू वाटप स्वतःच्या व पक्षाच्या माध्यमातून करत अनेकांना मदतीचा हात. कोरोनाचे संकट असताना मास्क वापरून, सोशल डिस्टन्स पाळून, स्वच्छता विषयक काळजी घेऊन कोरोनाला हरवू शकतो हेच त्यांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
उदय भोसले यांच्या राजकीय प्रवास कुणालाही हेवा वाटावा असाच आहे. त्यांनी नेहमी राजकीय कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी सत्तेत असल्याने सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. सर्वसामान्य कार्यकर्ता कसा उभा राहील यासाठी ते प्रयत्न करतात. अनेक कार्यकर्ते त्यांनी आज घडविले आहेत. त्यामुळे त्यांचे पक्ष कार्य पाहून भविष्यातही पक्षाकडून त्यांना उच्च पद नक्कीच मिळेल यात शंकाच नाही.
समाजाभिमुख राजकारण कसं करावं हे उदय भोसलेंकडून शिकावे. शांत, संयमी, आणि दूरदृष्टी असलेले उदय भोसले यांच्या काल वाढदिवस होता. *संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − five =