You are currently viewing सावंतवाडी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सावंतवाडी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सावंतवाडी:

मा.उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्षद बेग यांच्या वतीने सावंतवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले जेष्ठ नागरिक तथा बृहन्मुंबई महापालिकेचे निवृत्त कर्मचारी श्री सादिक बंगलेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी येथे आज आणि उद्या विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी सावंतवाडी तालुका युवक अध्यक्ष अर्षद बेग,बृहन्मुंबई महापालिकेचे निवृत्त कर्मचारी सादिक बंगलेकर,असिफ शेख,आशिष जकाती,महेश कदम राहील मेमन,आफताब बेग,मुदससीर शेख,अन्वर बेग,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा