You are currently viewing शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूल व कुडाळ हायस्कूलची बाजी

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूल व कुडाळ हायस्कूलची बाजी

बांव हायस्कूल व डिगस हायस्कूलचेही संघ विजेते!

तळेरे/ प्रतिनिधी :

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा कणकवली कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या ‘स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूलच्या खेळाडुंनी तब्बल दोन संघाचे विजेतपद, दोन संघांचे उपविजेतेपद व एका संघाने तृतीय क्रमांक पटकावून या वर्षीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आट्यापाट्या खेळातील आपला दबदबा कायम राखला आहे.

तर कुडाळ हायस्कूल व कॉलेजच्या खेळाडुंनी दोन संघाचे विजेतपद व तीन संघाने तृतीय क्रमांक पटकावत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

तर कुडाळ तालुक्यातील रामेश्वर माध्यमिक विद्यालय बांव शाळेच्या १७ वर्षा खालील मुलींच्या संघाने विजेतेपद,दोन संघाने उपविजेतेपद व एक संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर डिगस माध्यमिक विद्यालयाच्या मुलांच्या संघाने विजेतेपद व मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे.

कासार्डे हायस्कूल भव्य मैदानावर ही स्पर्धा येथे १४ व १५ सप्टेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमधील २८ संघांनी सहभाग दर्शविला होता.

 

*मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन -*

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कासार्डे विकास मंडळ मुंबईचे उपसचिव आनंद कासार्डेकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्यवाह रविंद्र पाताडे, सदस्य व माजी सैनिक रवींद्र पाताडे, कासार्डे विकास मंडळ मुंबई कार्यकारणी सदस्य अर्जून शांताराम पाताडे,प्रशालेचे प्र.पर्यवेक्षक एन्.सी.कुचेकर , जिल्हा माध्यमिक पतपेढीचे चेअरमन तथा पंच संजय वेतुरेकर,विजय मयेकर, बाळासाहेब ढेरे,प्रा.शाहजी गोफणे, कासार्डे विद्यालयचे क्रीडा शिक्षक तथा स्पर्धा प्रमुख दत्तात्रय मारकड,युवा क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष वैभव कोंडसकर, अनिकेत वेतुरेकर,निलेश फोंडेकर ,संजय गवस, सौ.ऋचा सरवणकर,यशवंत परब आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी संस्था पदाधिकारी अर्जुन सिताराम पाताडे यांच्या शुभहस्ते बलाची देवता हनुमानाच्या

प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच रविंद्र पाताडे यांच्या हस्ते आट्यापाट्या मैदानावर श्रीफळ वाढवून जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 10 =