You are currently viewing प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासदांचे वाढदिवस व सभासदांचा सांस्कृतिक कार्यक्रम थाटात साजरा”

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासदांचे वाढदिवस व सभासदांचा सांस्कृतिक कार्यक्रम थाटात साजरा”

*”प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासदांचे वाढदिवस व सभासदांचा सांस्कृतिक कार्यक्रम थाटात साजरा”*

प्राधिकरण-(प्रतिनिधी)
पिंपरी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा सभासदांचे वाढदिवस व सभासदांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम जेष्ठ नागरिक संघाच्या प्रांगणात उत्साहात सादर झाला.
रेलविहार संघ यांची सादरीकरण केले. रेल विहार संघातील सभासद बंधू भगिनींनी विविध गीते, सामूहिक नृत्य व त्याला संगीताची जोड देऊन उपस्थिततांचे छान मनोरंजन केले. सामूहिक नृत्य ‘राधा धुंड रही ‘या गाण्याने व बालकृष्णाने, प्रेक्षकांची वाहवा मिळवली तसेच सामूहिक नृत्य ‘खंडोबा पिवळा झाला हळद लागली’ गीत प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. सूत्रसंचालन मिसाळ ताईंनी केले. भगवान महाजन, काशिनाथ पाटील यांनी, कार्यक्रम नियोजन केले.

या कार्यक्रमात शोभा पाटील, भगवती टाक, आशा पाटील, नीता भरोडिया, प्रयागा मॅडम, इत्यादी यांनी सादरीकरण केले.
स्वानंद संघाने सादर केलेल्या २५ नोव्हेंबर २०२२ चे सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वाटप संघाचे अध्यक्ष चांदबी सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथम क्रमांक -१. विडंबन गीत,-चल ग मेट्रो झरा झरू (स्वरचित) -आनंदराव मुळूक.
२.’वऱ्हाड निघालय लंडनला’ (काही प्रवेश )- सतीश सगदेव.यांना विभागून देण्यात आले.
द्वितीय क्रमांक- १.तराणा- शैलजा महाजनी .
२.मुक्त छंद – ज्योती कानिटकर. यांना विभागून देण्यात आले तृतीय क्रमांक -‘अंबेचा गोंधळ’- ललिता जोशी, शैलजा महाजनी, पंडित वंदना उंब्रजकर, वसुधा जोशी यांना सांघिक देण्यात आले
परिक्षक म्हणून, ज्योती इंगोले ,समिता टिल्लू ,डॉ.शुभांगी म्हेत्रे, अलका बेल्हेकर यांनी काम पाहिले.
ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसाचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात तन्मय मोडक याचा कराटे मध्ये, द्वितीय क्रमांक मिळवल्या बद्दल विशेष सत्कार, अध्यक्ष चांदबी सय्यद यांच्या हस्ते स्कूल बॅग्ज देवून करण्यात आला.
उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी आभार प्रदर्शन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 8 =