You are currently viewing नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीस मुदवाढ

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीस मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी

सन 2017-18, 2018-19,2019-20 मधील इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षा शुल्क प्रतिपूतीस पात्र असलेल्या आणि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतीपूर्ती न झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीबाबत राज्यमंडळ स्तरावरुन ऑनलाईन माहिती मागविण्याची मुदत दि 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

            सन 2021 -20 मधील अवेळी पावसामूळे बाधित जिल्हयातील दुषकाळग्रस्त टंचाईग्रस्त, अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रभावित इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी इयत्ता 10 वी करिता http:feerefund.mh-ssc.ac.in आणि इयत्ता 12 वी करिता http:feerefund.mh-ssc.ac.in या लिंकवर ऑनलाईनव्दारे माहिती मागविण्यात आलेली आहे. लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahahsscboard.in प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

            तरी सर्व मुख्याध्यापक/ किनष्ठ महाविद्यालय प्राचार्यऱ्यांनी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना आधारकार्ड व इतर आवश्यक माहिती विहित वेळेत भरणेबाबत अवगत करुन विनाविलंब कार्यवाही करावी. यांची नोंद घ्यावी, अशी माहिती डॉ. शिवलिंग पटवे विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ  यांनी दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 3 =