You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्धशतकांच्या व्य़ाख्यान पुष्पासहित निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्धशतकांच्या व्य़ाख्यान पुष्पासहित निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, विद्यार्थ्यांच्या ह्रदयावर राज्य करणारे, शून्य मानधन असणारे प्रेरणादायी उच्चशिक्षित व्याख्याते व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, माननीय श्री. सत्यवान यशवंत रेडकर पुन्हा आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण करणार आहेत. आजवर त्यांनी महाराष्ट्रात 70 पेक्षा जास्त निःशुल्क व्याख्याने घेतली आहेत.

दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक, सावंतवाडी आयोजित बी.के.सी.हॉल सावंतवाडी येथे हे निःशुल्क व्याख्यानाचे 50 वे पुष्प असेल. त्याचप्रमाणे दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी, 13 फ्रेब्रुवारी रोजी कणकवली तालुक्यात सकाळच्या सत्रात सकाळी 9.00 वाजता श्री. चंद्रकांत पारिसा रायबागकर हॉल, शेठ न.म.विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय, खारेपाटण त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात 1.30 वाजता विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग 66, तळेरे येथे निःशुल्क मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 2 =