You are currently viewing जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यात ९९.५२% मतदान…

जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यात ९९.५२% मतदान…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यात एकूण ९९.५२% इतके मतदान झाले. यावेळी २१२ पैकी २११ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर एक मतदार बाहेरगावी असल्यामुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाही. ही मतदान प्रक्रिया आज येथील तहसीलदार कार्यालयात शांततेत पार पडली.
येथील मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात २३ महिलांनी, तर १८८ पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. या वेळी मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान महाविकास आघाडी व भाजप अशी दोन बुथ मतदान स्थळी लावण्यात आली होती. यावेळी दोन्ही बुथांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात ही गर्दी पांगवताना पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र दोघांनी सहकार्याची भूमिका घेत आवाज शांत केला. अखेर झालेली मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत शांततेत पार पडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा