You are currently viewing असनिये-गावठणवाडी येथे बोलेरोची विद्युत खांबाला धडक…

असनिये-गावठणवाडी येथे बोलेरोची विद्युत खांबाला धडक…

सावंतवाडी

असनिये-गावठणवाडी येथे बोलेरोने विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. यात बोलेरोचे नुकसान झाले असून, विद्युत खांब पूर्णपणे तुटला आहे. हा अपघात आज सायंकाळच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावठणवाडी येथील अंगणवाडीच्या रंगकामासाठी रंग घेऊन हा बोलेरो आला होता.गाडी मागे घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बोलेरोची धडक विद्युत खांबाला बसली.धडक जोरदार असल्याने खांब पूर्णपणे तुटला.यामुळे गावठणवाडी येथीलवीजपुरवठा खंडित झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा