You are currently viewing मिशन आयएएसच्या लेखिका कवयित्री श्रीम.पल्लवी उमरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

मिशन आयएएसच्या लेखिका कवयित्री श्रीम.पल्लवी उमरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

अमरावती :

 

अमरावतीच्या मिशन आयएएस ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या सदस्या श्रीमती पल्लवी उमरे यांना त्यांच्या गंधाळलेल्या स्वप्नकोषी या पुस्तकाला अकोला येथील अंकुर साहित्य संघाचा ललित या वाङ्मय प्रकारातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पुस्तके आली होती. त्यातून श्रीमती पल्लवी उमरे यांच्या पुस्तकाची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील धुळे येथे होणाऱ्या राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरातील साठाव्या राज्यस्तरीय अंकुर साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. श्रीमती पल्लवी उमरे हया मराठी साहित्य विषयातील सुप्रसिद्ध लेखिका असून त्यांना याआधी पण विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. साहित्याबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी मिशन आयएएसच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रकाशनार्थ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − five =