You are currently viewing झाराप पत्रादेवी मार्गावरील मळगाव बायपास येथे दुचाकीस्वाराचा अपघात

झाराप पत्रादेवी मार्गावरील मळगाव बायपास येथे दुचाकीस्वाराचा अपघात

झाराप पत्रादेवी मार्गावरील मळगाव बायपास येथे दुचाकीस्वाराचा अपघात

कुडाळ :

मळगाव येथे झाराप पत्रादेवी महामार्गावर सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी रिप्लेक्टर न लावल्याने दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने रस्त्यावर ओतलेल्या खडी वर आढळून अपघात झाला . यात दुचाकीस्वाराला व त्याच्या मागे बसलेल्या युवकाला दुखापत झाली आहे पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

हा अपघात काल रात्री रात्री साडेआठ च्या सुमारास घडला. सदर कामाच्या बाबत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सुशेगात असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे कोणाचा तरी बळी जाऊ शकतो ; त्यासाठी तात्काळ कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व आवश्यक यंत्रणा उभी करा अशी मागणी ग्रामस्थातून व वाहन चालकातून होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा