You are currently viewing रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला नागरिकांचा सज्जड दम..

रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला नागरिकांचा सज्जड दम..

ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय; नानेली ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश धुरी

सिंधुदुर्ग :

जिल्ह्यात घावनळे-नानेली-माणगाव-कालेली या रस्त्यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल करून कामात व्यत्यय आणणाऱ्या मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या विरोधात तेथील नागरिक आक्रमक होऊन गावातून निघून जाण्याचा इशारा दिला. दरम्यान ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय झाल्याची माहिती नानेली ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश धुरी दिली.

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडेंना माणगाव-नानेली येथील ग्रामस्थांनी सज्जड दम दिला. त्यावेळी माणगाव उपसरपंच श्रावण धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माजी सरपंच आणि ग्रा.पं. सदस्य सदस्य सचिन धुरी, माजी उपसरपंच महेश भिसे, माजी उपसरपंच सचिन परब, शिवसेना विभाग संघटक कौशल जोशी, नानेली सरपंच प्रज्ञेश धुरी, नानेली ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश धुरी, बाबू वारंग, रवी नानचे, रिक्सन शिरोडकर, अक्षय पालकर, गणेश नार्वेकर तसेच माणगाव-नानेली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील कुडाळ मनसे तालुकाप्रमुख प्रसाद गावडे यांनी घावनळे-नानेली-माणगाव-कालेली रस्त्यासंदर्भात आरटीआयच्या माध्यमातून तक्रार अर्ज दाखल करुन रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी एकजूट दाखवून आमच्या गावच्या तक्रारी करून गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडेल त्यामुळे आपण गावाच्या बाहेर जावे, असा इशारा ग्रामस्थांनी गावडेंना दिला.

मनसेचे प्रसाद गावडे नेहमी आरटीआय च्या माध्यमातून अधिकारी वर्गाला वेठीस धरतात. शिवाय स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत कामामध्ये अडथळा निर्माण करतात. त्यांनी आरटीआय च्या नावाखाली ग्रामीण भागातील विकास कामात खो घालू नये असा सल्ला देखील माणगाववासीयांनी गावडेंना दिला.

दरम्यान, घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत मनसेचे पक्षश्रेष्ठी गावडेंवर कारवाई करणार का? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश धुरी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 6 =