You are currently viewing आमदार नितेश राणे यांचा शब्द प्रमाण मानत स्टॉलधारकांची सहकार्याची भूमिका

आमदार नितेश राणे यांचा शब्द प्रमाण मानत स्टॉलधारकांची सहकार्याची भूमिका

वैभववाडी शहरातील स्टॉल स्वतःच हटविण्यास केली सुरुवात

वैभववाडी

वैभववाडी शहरात अनधिकृतरित्या उभारलेले स्टॉल हटविण्यास स्टॉल धारकांनी स्वतःहून सुरुवात केली आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतने स्टॉल हटविण्याची नोटीस दिल्यानंतर गेली पंधरा दिवस वातावरण तणावाचे झाले होते. परंतु आमदार नितेश राणे यांनी आपले पुनर्वसन शहरातच करू प्रशासनाला सहकार्य करा. असे आवाहन स्टॉल धारकांना केले होते. दरम्यान दोन दिवसाची मुदत द्या, अशी विनंती स्टॉलधारकांनी केली होती. ठरल्याप्रमाणे स्टॉल धारकांनी शब्द पाळत गुरुवारी दुपारपासून स्टॉल हटविण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील दत्त मंदिर चौक, नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गा माता पटांगण या जागेच्या समोरील शासकीय जागेत स्टॉल उभारले होते. रस्त्याकडेला स्टॉल असल्याने विविध विकासकामे राबविण्यात अनेक अडचणी येत होत्या. प्रलंबित विकास कामे मार्गी लागावी यासाठी बाजारपेठेतील संपूर्ण स्टॉल हटविण्यात यावेत, अशी मागणी मासिक सभेत करत सर्व नगरसेवकानी ठराव पास केला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला सहमती दर्शवली होती.

त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनधिकृत स्टॉल धारकांना स्टॉल हटविण्याबाबत नोटीस दिली. सर्व स्टॉल धारकांनी एकत्रित येत उपोषणाचा हत्यार बाहेर काढले. दोन दिवस उपोषण केले. दरम्यान नगरपंचायत प्रशासन स्टॉल हटविण्यावर ठाम राहिले. मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी स्टॉल धारकांची बैठक घेतली. राज्यात वैभववाडी शहर आदर्श शहर बनवूया. त्यासाठी विकास कामे मार्गी लागणे फार गरजेचे आहे. आपण प्रशासनाला सहकार्य करावे. स्टॉलधारकांचे पुनर्वसन शहरातच केले जाईल. असा शब्द नितेश राणे यांनी स्टॉल धारकांना दिला होता. आ. नितेश राणे व स्टॉल संघटनेचे नेते जयेंद्र रावराणे यांच्या मध्यस्थीनंतर स्टॉलधारकांनी स्टॉल काढण्याचा निर्णय घेतला. तर नितेश राणे यांचा शब्द प्रमाण मानत स्टॉल धारकांनी आपले स्टॉल दोन दिवसात हटवतो असे सांगितले होते. त्याप्रमाणे स्टॉल धारकांनी गुरुवारी दुपारपासून आपले स्टॉल हटविण्यास सुरुवात केली आहे. चिकन विक्रेत्यांना नगरपंचायत ने तात्पुरती सोय विसर्जन घाट रस्त्याकडे केली आहे. उर्वरित स्टॉल उद्या हटविणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा