You are currently viewing २२ डिसेंबर पासून ओरोस येथे परब मराठा ज्ञाती बांधवांचा हिरक महोत्सव सोहळा

२२ डिसेंबर पासून ओरोस येथे परब मराठा ज्ञाती बांधवांचा हिरक महोत्सव सोहळा

ओरोस :

परब मराठा समाज मुंबई, संलग्न सिंधुदुर्ग ज्ञाती बांधवांचा हिरक महोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक २२ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय ओरोस फाटा या ठिकाणी आयोजित केला आहे.या निमित्ताने सन २०२२-२०२३ या सालामध्ये विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा शुक्रवार २२ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडणार आहे तरी १५ डिसेंबर या वेळेत आपली नाव नोंदणी खाली दिलेल्या संपर्क प्रमुखांशी साधायची आहे.असे आवाहन परब समाज मुंबई संलग्न सिंधुदुर्गचे मंडळाचा वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान कार्यक्रमावेळी इयत्ता ५ वी इयत्ता ८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, १० चे ७५% गुण प्राप्त विद्यार्थी, १२ चे ७०% पेक्षा गुण प्राप्त विद्यार्थी, तसेच पदवीधर व उच्च पदवीधर यांनी A+ पेक्षा जास्त गुणधारक, तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता प्रमाणपत्र पीडीएफ द्वारे नोंदणीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर पाठवायचे आहेत.

यावेळी दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.श्री देव रवळनाथ मंदिर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरस फाटा, तसेच इच्छापूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी परब ज्ञाती बांधवांचा कार्यक्रमानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत महोत्सव कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ६० समाज बांधव-भगिनींचा सत्कार सोहळा व भाग्यवान सोडत, (लकी ड्रॉ) तसेच दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी या कार्यक्रमासाठी मुंबई सह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, बेळगाव, पुणे, गुजरात मधील परब ज्ञाती बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विनायक परब, यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी शुभम परब फोन नंबर ८४८२८९४७२२, सुशिल परब, महादेव परब, जयेंद्रथ परब, येथे संपर्क साधावा व आपले गुणवत्ता प्रमाणपत्र पीडीएफ द्वारे या ठिकाणी पाठविण्यात यावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा