You are currently viewing जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा नियमित सुरू

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा नियमित सुरू

– जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील

सिंधुदुर्गनगरी

शासन धोरण व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

          प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. माहे मार्च 2020 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये हे कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत आहेत. या साथीच्या कालावधीमध्ये असंख्य कोविड बाधीत रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आलेले आहेत. तरी सध्यस्थितीमध्ये कोविड रुग्णांची संख्या ही अल्प प्रमाणात असून नवीन लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्या अनुषंगाने शासन धओरण व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णसेवा सुरू करण्यात येत आहे.

          जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोविड बाधीत रुग्णांकरिता नियमित रुग्णसेवा सद्यस्थितीतही सुरू राहतील. तसेच रुग्णालयीन सर्व विभागांच्या बाह्यरुग्ण सेवा, अपघात, वैद्यकीय सेवाही सुरू आहेत. मात्र सद्या टप्याटप्याने या सर्व विभागांच्या अंतररुग्ण सेवा कार्यान्वित करण्यात येत आहेत.

          या नॉन कोविड रुग्णसेवा शासकीय रुग्णालयांमध्ये चालू होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करून रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यात केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + seven =