You are currently viewing आजी -आजोबांच्या पोतडीतील प्रेरणादायी गोष्टी “अभिनव राज्यस्तरीय स्पर्धेत शिरगावची कु.दुर्वा कुबल कोकण विभागीतून द्वितीय

आजी -आजोबांच्या पोतडीतील प्रेरणादायी गोष्टी “अभिनव राज्यस्तरीय स्पर्धेत शिरगावची कु.दुर्वा कुबल कोकण विभागीतून द्वितीय

कणकवली

इंटरनॅशनल सेंटर पुणे अर्थात PIC पुणे यांच्या माध्यमातून Gyan – Key वाचनालय “आजी -आजोबांच्या पोतडीतील प्रेरणादायी गोष्टी ” या अभिनव स्पर्धेत जि. प. केंद्रशाळा शिरगांव नं.1 ता. देवगड या शाळेतील गुणवान विध्यार्थीनी कु. दुर्वा मनिष कुबल, इयत्ता 2री हिने महाराष्ट्र राज्यात कोकण विभागात द्वितीय क्रमांक मिळवून सुयश मिळविले.
कोकण विभागातून सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या गुणवंत विद्यार्थीनीला डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर, डॉ. विजय भटकर, डॉ. नरेंद्र जाधव, एअर मार्शल भूषण गोखले अशा अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते यशदा पुणे येथे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या गुणवंत विद्यार्थीनीला शाळेचे उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. मेघना साटम, उपाध्यक्ष श्री. योगेश तावडे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + twenty =