You are currently viewing विजेचा पोल अंगावर पडून रेडीतील महिला गंभीर जखमी 

विजेचा पोल अंगावर पडून रेडीतील महिला गंभीर जखमी 

वीज वितरण विभागाचा गलथान कारभार

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी – भीमनगर येथील सुमित्रा सुनील रेडकर या महिलेल्या अंगावर विजेचा सिमेंटचा खांब पडून महिला गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले आहे.

आज सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुमित्रा रेडकर ही महिला आपल्या घरा शेजारी असलेल्या मिरच्या काढण्यास गेली असता घरा शेजारी असलेला सिमेंटचा वीज पोल अचानक कोसळून तिच्या अंगावर पडला. त्यात तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान यावेळी लाईटचे काम पुढे सुरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित होता यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेकी तात्काळ त्या महिलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान या संदर्भात येथील ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत याबाबत शिरोडा पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. तर याबाबत वीज वितरण कडून योग्य ते सहकार्य न मिळाल्यास ग्रामस्थ वीज वितरण च्या कार्यालयाला धडक देऊ असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा