You are currently viewing रुग्णवाहिकेच्या टपावर बसून करणार उपोषण

रुग्णवाहिकेच्या टपावर बसून करणार उपोषण

मळेवाड सरपंच हेमंत मराठेे

सद्यस्थितीत जिल्हा रेड झोन मध्ये असताना, तसेच कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांच्या सेवेसाठी खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून पासिंग करून न घेतल्याने गेले पाच ते सहा दिवस मुख्यालयाला उभे आहेत. यातील एक रुग्णवाहिका ही मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आली होती. मात्र सदरच्या रुग्णवाहिकेचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून पासिंग झाल्याशिवाय मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला देता येणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आज सदर रुग्णवाहिकेचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पासिंग करूनर ती मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार होती. यामुळे रुग्णवाहिका ताब्यात घेण्यासाठी चालक व मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अदिती ठाकूर ओरोस येथे दाखल झाल्या होत्या. मात्र काही कारणास्तव रुग्णवाहिका ताब्यात देऊ शकणार नाही असे त्यांना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे चालक व डॉक्टर माघारी परतले.

एकीकडे सद्यस्थितीत कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका मिळत नसताना शासनाकडून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका पाच दिवस वापर न करता केवळ पासिंग केले नाही या कारणामुळे मुख्यालयात शोभेच्या वस्तू सारख्या उभ्या करून ठेवणे योग्य आहे का? याबाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी निर्णय घेतील का? अन्यथा 4 जून पर्यंत रुग्णवाहिका आरोग्य केंद्रांना न दिल्यास मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे हे मुख्यालयात उभ्या करून ठेवलेल्या रुग्णवाहिकेच्या टपावर बसून उपोषण उपोषण करणार आहेत. त्यामुळे आता प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 14 =