You are currently viewing श्री देव भैरवनाथ मंदिर जीर्णोध्दार, कलशारोहण सोहळा

श्री देव भैरवनाथ मंदिर जीर्णोध्दार, कलशारोहण सोहळा

श्री देव लिंगेश्र्वर मंदिरात महाअभिषेक, भाविकांची अलोट गर्दी

 

वरवडे / कणकवली :

 

वरवडे (ता.कणकवली) येथील श्री देव भैरवनाथ मंदिराच्या कलशारोहण धार्मिक विधीस लिंगेश्वर मंदिरात प्रारंभ झाला.
वरवडे येथील श्री देव भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण, जीर्णोध्दार सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असलेल्या चाकरमान्यांनीही आवर्जून उपस्थिती दर्शविली आहे.

लिंगेश्वर मंदिरात सकाळी श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, महाअभिषेक, ग्रहयज्ञ होम, आरती व महाप्रसाद झाला.
सायंकाळी ६ ते ८ पर्यंत कीर्तन व ८ ते१० पर्यंत ह.भ.प शिवाजी चिंचोलकर, कोल्हापूर यांचा हरिपाठ व रात्री १० नंतर २०-२० बुवा प्रकाश पारकर व बुवा संतोष कानडे यांचा जंगी डबलबारी सामना होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 1 =