You are currently viewing बेस्ट उपक्रमामध्ये शिवजयंती साजरी

बेस्ट उपक्रमामध्ये शिवजयंती साजरी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

रविवार, दिनांक १९/२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा येथील मुख्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.

बेस्टचे महाव्यवस्थापक तथा प्रशासक माननीय श्री. लोकेश चंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि वंदन केले. त्यानंतर बेस्टचे सहाय्यक महाव्यवस्थापक सर्वश्री राजेंद्र डुबल आणि नितीन हेर्लेकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =