You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विवीध सेवा कार्य आयोजित करुन “सेवा पंधरवडा” साजरा करणार

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विवीध सेवा कार्य आयोजित करुन “सेवा पंधरवडा” साजरा करणार

*उभादांडा – नवाबाग सागरकिनारा स्वच्छता अभियान राबवुन सेवा पंधरवड्याचा शुभारंभ…….*

 

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा चे नियोजनाची बैठक प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी सेवा पंधरवडा – जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांनी प्रदेश भाजपा ने दिलेली १७ सेवाकार्य कशा पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक सेवा कार्याला संयोजक व सहसंयोजक नियुक्त करून तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली.

यावेळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर व कोवीड लसीकरण, कृत्रिम अवयव वितरण, वयोश्री योजनांचे कॅम्प, बुद्धीजीवी संमेलन, व्होकल फाॅर लोकल, स्वच्छ भारत अभियान, जल ही जिवन, वृक्षारोपण, तलाव स्वच्छ करणे, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

२ ऑक्टोबर – गांधी जयंती निमित्त स्वदेशी, खादी, स्वावलंबन, साधेपणा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार असुन, खादीचा प्रसार होण्यासाठी खादीचे कपडे जास्तीत जास्त नागरीकांनी खरेदी करावे यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, नगराध्यक्ष राजन गीरप, जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, ता.चिटणीस समीर चिंदरकर व समीर कुडाळकर, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर व रसीका मठकर, युवा मोर्चाचे नारायण कुंभार व पींटू सावंत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, *शक्ती केंद्र प्रमुख* – संतोष शेटकर, महादेव नाईक, सुधीर गावडे, सतीश धानजी, गणेश गावडे, ताता मेस्त्री खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, अल्पसंख्याक सेलचे रफीक शेख, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व ज्ञानेश्वर केळजी, *बुथप्रमुख* – रविंद्र शिरसाठ, शेखर काणेकर, विनय गोरे, दादा तांडेल, सुनील घाग, गुरुनाथ घाडी, दादा सावळ, पुंडलिक हळदणकर, सत्यवान पालव, उदय गावडे, सत्यवान परब, नारायण गावडे, शशी करंगुटकर तसेच तालुक्यातील बरेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा