You are currently viewing सलोखा योजनेमुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा – प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने

सलोखा योजनेमुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा – प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने

सलोखा योजनेमुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा – प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने

सिंधुदुर्गनगरी

शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमिन धारकाच्या जमिन अदलाबदलानंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनींचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाईपलाईन वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा फायदा होऊ शकतो.  शेतकऱ्यांचे आपआपसातील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. सलोखा योजना राबविली तर अशा परस्परविरोधी ताब्याबाबत असलेली विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली निघतील. त्यामुळे समाज व शेतकऱ्यांचा फायदा होईल.तरी या योजनानेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने यांनी केले आहे.

       महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक मुद्रांक- २०२२/ प्र.क्र. ९३/म- १ (धोरण) दिनांक ३ जानेवारी २०२३ अन्वये राज्य भरात सलोखा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या  शेतकऱ्याकडे  व दुसऱ्या  शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे १२ वर्षेपासून असणाऱ्या  शेतजमिनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.१०००/- व नोंदणी फी नाममात्र रु.१०००/- आकारण्याबाबत सवलत देण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − two =