You are currently viewing प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत..               

प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सादर करावेत..               

 सिंधुदुर्गनगरी:

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग, यांच्याकडून कोकण विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्रता धारकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

     अर्जदारांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे- मान्यमताप्राप्त विद्यापिठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड अे), उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.)धारक, चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.), इन्स्टिट्युट ऑफ कास्ट अँड वर्कर्स अकाऊंटंट (आय.सी.डब्ल्यु.ए.), कंपनी सेक्रेटरी (सी.एस.),सहकार खात्यातील प्रशासन/लेखापरिक्षण विभागातील सेवा निवृत्त अधिकारी /कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक

       अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे- उदा. केवायसी नॉर्मस जन्म दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो इत्यादी. अनुभवाचा तपशिल- संस्थेचे नांव, कामकाजाचा तपशिल पद व कालावधी (पद, कामाचे स्वरुप इत्यादी), संगणकीय ज्ञान आवश्यक उदा. एम.एस.सी.आय.टी. व अन्य. तसेच अर्जदारास मा. न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नसावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + eight =